पाणीटंचाई निवारणासाठी ८.२५ कोटींचा आराखडा

Foto
सोयगाव, (प्रतिनिधी) तालुक्यात जाणवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ८ कोटी २१ लाख रुपयांचा टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात विहिरी, दुरुस्ती आणि अधिग्रहणासह एकूण २८० उपाययोजनांचे नियोजन केले आहे.

टंचाई काळात पर्यायी जलस्रोत उपलब्ध व्हावेत, यासाठी १०९ नवीन विहिरी, ४३ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि १३ तात्पुरत्या पूरक योजना प्रस्तावित आहेत. तसेच ११५ खासगी विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्याचे नियोजन आहे.  पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला असून, मंजुरीसाठी तो जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शिवाजी यमूलवाड यांनी दिली.